पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

एकाच दिवशी विविध अपघातांत 15 जणांचा मृत्यू.....

पुणे - सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा

सोलापुर - पुणे- सोलापूर महामार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा बनलाय

या महामार्गावर दररोज कुठे न कुठे अपघात घडत असून काल शनिवारी एकाच दिवसात वेगवेगळ्या अपघातांमध्ये 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय..

शनिवारी पहाटे उरुळी कांचन येथे ट्रक आणि मिनीबसचा अपघात होऊन 11 जण ठार झाले होते त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पाटसच्या उड्डाण पुलावर दुचाकीवर असणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 2 जण जागीच ठार झाले. तर याच महामार्गावरील इंदापूर जवळ रात्रीच्या सुमारास बोलेरो जीप आणि दुचाकीचा अपघात होऊन पुन्हा 2 जणांना आपला जीव गमवावा लागला.

एकाच दिवसात एकाच महामार्गावर पन्नास किमीच्या अंतरावर झालेल्या या विविध अपघातांमुळे 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हा महामार्ग सहा पदरी असूनही दररोज या महामार्गावर कुठे न कुठे भीषण अपघात होऊन निष्पापांचा बळी जात आहे...

त्यामुळे हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे.


Next Story
Share it
Top
To Top