पुण्यात सेक्स रॅकेटचे प्रमाण वाढले

पुण्यात सेक्स रॅकेटचे प्रमाण वाढले

पुण्यातील सेक्स रॅकेटचे प्रमाण वाढले असून सहकारनगर परिसरातील तीन लॉजमध्ये सुरू असणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी कारवाई करत २६ मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. सेक्स रॅकेटमध्ये काम करणारे मुली, नवी मुंबई, कलकत्ता, उत्तरप्रदेश येथील असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दत्तात्रय इंगळे (२३, )पृथ्वीराज सिंग (वय २४)सतिश चलवे गोंढा ( ३७) विनोद अक्षय पांडे ( २२), अनिल रावसाहेब लोंढे (२१) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी रघु शेट्टी, शेखर आण्णा, रुपेश व राजन हे फरार आहेत. तसेच त्यांच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात पिटा अॅ्क्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बेंगलोर येथील फ्रीडम या एनजीओचे सदस्य परशुराम महादेव बनसोडे यांनी फिर्याद दिली.

मूळचे सांगली जिल्ह्याचे असणारे बनसोडे फ्रीडम या एनजीओसाठी काम करतात. एनजीओचे बँगलोर येथे मुख्य कार्यालय असून, पूर्ण भारतात अॅन्टी ह्युमन ट्राफिकिंगसाठी काम करतात. त्यानुसार बनसोडे यांना सहकारनगर परिसरात लॉजमध्ये मुलीकडून वेश्याव्यावसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करून पाच जणांना अटक केली आहे .

दरम्यान, सराफखाना येथे एका अल्पवयीन मुलीची ६० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे पुण्यातील सेक्स रॅकेटचे वाढते प्रमाण सांस्कृतिक पुण्याच्या प्रतिमेला कलंक लागण्यासारखे आहे.


Next Story
Share it
Top
To Top