पॉर्न फिल्ममुळे विमान प्रवाश्याला अटक

पॉर्न फिल्ममुळे विमान प्रवाश्याला अटक

मुंबई विमान प्रवास दरम्यान हवाई सुंदरीला पॉर्न फिल्म दाखवुन छेडणारया एका 43 वर्षीय प्रवाश्याला मुंबई विमानतळाच्या पोलिसांकडून अटक.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार प्रवाशी पॉर्न विडीओ पाहत असताना हवाई सुंदरी आणि तिच्या सुपरवाईझरने पकडले. ही घटना शनवारी सकाळी घडली. याप्रकरणी हवाई सुदरीने पोलिसांना माहिती दिली असता पोलिसानी प्रवाश्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे . आरोपी विरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक होण्यापूर्वी या बिझनेसमनने सर्व क्लिप्स डिलीट केल्या. त्यामुळे त्याच्या विरोधात पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, डिलीट केलेले व्हिडीओ परत मिळवण्यासाठी मोबाइल एफएसएल लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. तक्रार नोंदवणा-या 26 वर्षीय एअरहोस्टेसने आरोपीला दोनवेळा पॉर्न क्लिप पाहताना पाहिले. आरोपीने दोन्ही वेळा मोबाईलची स्क्रीन मला दाखवण्याचा प्रयत्न केला असे तिने म्हटले आहे. हवाईसुंदरीने तात्काळ सुपरवायझरच्या कानावर ही गोष्ट घातली. सुपरवायझरनेही आरोपीला क्लिप पाहताना पाहिले. तिने तात्काळ वैमानिकाला माहिती दिली. त्याने पोलिसांना सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top