पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे - पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज

पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे -  पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज

गौतम वाघ

अंबरनाथ: पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागावे , शांतपणे तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घ्यावे असे आदेश परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी पोलीस ठाण्यांना दिली आहे .

पोलीस ठाण्यातील बहुतेक कर्मचारी व अधिकारी हे सर्वसामान्य तक्रारदारांशी सौजान्यानेच वागत असतात मात्र काही अधिकारी व कर्मचारी उर्मटपणे वागत असतात . अशा पोलीस अधिकारी व कर्मचारींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे . मात्र माझ्याकडे याबाबत तक्रार आल्यास तत्परतेने कारवाई करणार असे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले . काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ( अंबरनाथ ) पोलीस हवालदार खोब्रागडे यांनी एका गुन्हेगार वृत्तीच्या इसमाच्या सांगण्यावरून पत्रकाराला धमकावले होते . या बाबत पोलीस उपायुक्त यांच्याकडे खोब्रागडे यांची तक्रार पत्रकारांनी केली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी गंभीरतेने दखल घेतली असून खोब्रागडे यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले आहे .


Next Story
Share it
Top
To Top