पोलिसांमुळे महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

पोलिसांमुळे महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

संपूर्ण थरार पाहा

[embed]https://youtu.be/5GHcSbIvwK4[/embed]

वडाळा पश्चिम इथं राहणाऱ्या एका तीस वर्षीय महिला वकिलाने आर.ए किडवई मार्गावर एका बांधकाम सुरू असलेल्या 20 मजल्याच्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येपुर्वी तिनं सोशल मीडियावर टाकलेला तिचा व्हिडिओ डिलीट केला होता. याच परिसरात राहणाऱ्या एका नागरिकानं तिला बघितलं आणि त्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी सदर महिला वकिलाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. शेवटी, चेंबूर पोलिस ठाण्याच्या विशेष अधिकारी शालिनी शर्मा यांना बोलावण्यात आलं. त्यानंतर शर्मा यांनी तिच्याशी चर्चा केल्यानंतर महिला वकिल खाली आली. सकाळी 10.45 ते दुपारी 3.15 अशी सुमारे 5 तास ही मोहीम पोलिसांनी राबवली. या महिला वकिलाचं अजूनही समुपदेश करणं सुरू आहे. ती आत्महत्या का करत होती, यामागचं अधिकृत कारण अद्याप समजू शकलेलं नाही.


Next Story
Share it
Top
To Top