पोलिस अधिका-यांचा गौरव करणे पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम - सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत 

पोलिस अधिका-यांचा गौरव करणे पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम - सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत 

उत्तम बाबळे

नांदेड :- बदलुन जात असलेल्या पोलिस अधिका-यांचा गौरव सोहळा साजरा करणे म्हणजे त्यांच्या कर्तव्य निष्ठेची जणु पावती देण्या सारखे आहे.महानगर मराठी पत्रकार संघाने राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असून पोलिस अधिका-यांचे बळ वाढवणारा आहे असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी व्यक्त केले.

महानगर पत्रकार संघातर्फे नांदेड येथुन बदलून जात असलेल्या जेष्ठ पोलिस अधिकारी राजु तासीलदार, सतिश गायकवाड व रघुनाथ कदम यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. गुरूद्वारा बोर्डाचे विशेष कार्य अधिकारी सरदार डी.पी. सिंघ यांच्या अध्यक्षतेखाली हा निरोप तथा गाैरव समारंभ शासकीय विश्रामगृह नांदेड येथे पार पडला.

पोलिस - जनता व पत्रकार यांच्यातील संबंध अधिक चांगले व्हावेत असा प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे असे सांगून सहाय्यक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत पुढे म्हणाले की पोलिस निरीक्षक राजु तासीलदार, सतिश गायकवाड, रघुनाथ कदम यांनी कायदा व सुव्यवस्था राखन्यात व समाजाप्रती उतराई होण्याची महत्वाची भूमिका बजावली. ते कर्तव्य दक्ष व प्रामाणिक अधिकारी आहेत,असा उल्लेख त्यांनी केला. यावेळी पोलिस निरीक्षक तासीलदार,गायकवाड, रघुनाथ कदम यांनी नांदेड व येथील नागरीकांनी दिलेल्या सहकार्य व प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रारंभी महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी प्रास्ताविक केले. पोलिस उपअधीक्षक पंडित यांच्या हस्ते अधिका-यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय पद्मशाली समाज संघाचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्रीधर सुंकरवार यांचा गुरूद्वारा बोर्डाचे विशेष कार्य अधिकारी सरदार डी. पी.सिंघ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी नानक साई चे उपाध्यक्ष सुभाष बल्लेवार, जी. नागय्या, तुलसीदास भुसेवार, व्दारकादास माहेश्वरी, विनायक पाथरकर, सरदार राणा रणबीरसिंघ पंजाबहोटलवाले, सरदार दारासिंग,दुष्यंत सोनाळे,पत्रकार विश्वनाथ देशमुख,शिवसेना महानगर प्रमुख बाळू खोमणे, माजी जि.प.सदस्य रमेश सरोदे,सरदार निलज्योतसिंघ खोखर, प्रल्हाद कांबळे, प्रल्हाद सुरकुटवार, गणेश गुंडेवार, संतोष मानधने, विजय गड्डम, महानगर पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष कृष्णा उमरीकर, उपाध्यक्ष नागनाथ देशमुख,किरण कुलकर्णी,आयुब पठाण, सरचिटणीस सुनील पारडे, सचिव प्रशांत गवळे,आनंद कुलकर्णी,जयप्रकाश नागला,सुरेश काशीदे, दता धोतरे, नरेश दंडवते,सखाराम कुलकर्णी,भास्कर तुम्मा.,महम्मद शाहेद,नरेंद्र गडप्पा, धर्माआनंद पेंटा सुर्यकुमार यन्नावार, दिपक बावस्कर, गोविंद उबाळे, सुमेध बनसोडे, गंगाधर पांचाळ, भुषण सोनसळे, कुवरचंद मंडले,अमृत देशमुख,ज्ञानेश्वर सुनेगावकर, यांची उपस्थिती होती.


Next Story
Share it
Top
To Top