पोलिस पाटलाच्या भावानं केला विवाहितेवर बलात्कार

पोलिस पाटलाच्या भावानं केला विवाहितेवर बलात्कार

  • आरोपी आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद - गावच्या पोलिस पाटलाच्या भावाने १८ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली. सतीश सोनवणे (३०) असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह पोलिस पाटील नंदकिशोर सोनवणे (४०, रा. सिंधी सिरजगाव याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहिता माहेरी आली होती. १५ दिवसांपूर्वी सतीश सोनवणे तिच्या घरात घुसला त्याने तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट कुणाला सांगितल्यास तुझ्या आईवडिलांना आणि भावाला जिवंत जाळून टाकीन, अशी धमकी दिली. या घटनेची तक्रार घेऊन पीडिता आरोपीचा मोठा भाऊ तथा पोलिस पाटील नंदकिशोरकडे गेली असता त्यानेही पीडितेला धमकावले. अखेर पीडिता २५ एप्रिल रोजी दौलताबाद ठाण्यात पोहोचली तिने या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी सतीश नंदकिशोर यांच्याविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे करीत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top