पोलीस ठाण्यातून चोरीला गेलेली पिस्तुले सापडली पोलिसाच्या घरी

सोलापूर : मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेलापोलीस नाईक दत्तात्रय गोरख भोसले सध्या मावस भावाच्या खूनप्रकरणी कर्जत (जि. नगर) पोलिसांच्या अटकेत आहेत. आर्श्चय म्हणजे काही दिवसांपूर्वी मंगळवेढा पोलीस शस्त्रागारातून चोरीला गेलेल्या दोन पिस्तूल भोसले याच्या घराच्या झडतीत सापडल्या आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान परवानाधारकांकडून ६८ शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली होती. त्यामध्ये ५० बंदुका,१५ रिव्हॉल्व्हर व ३ पिस्तुले होती. यामधील दोन पिस्तुलेसात महिन्यांपूर्वी पोलीस कस्टडीतून गायब झाली होती. पिस्तूलधारक अनिल गायकवाड व नवीनकुमार विग यांनी पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांच्याकडे याबाबततक्रार केली होती.

सात महिन्यांच्या शोधानंतर अखरे १६ ऑगस्ट रोजी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखलकरण्यात आला होता. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या पथकाने शुक्रवारी दुपारी दत्तात्रय भोसले याच्या पोलीस लाइनमध्ये असलेल्या निवासस्थानाची झाडाझडती घेतली. या वेळी किचनवरील माळ्यावर दोन फूट लांबीचे काळ्या रंगाचे पिस्तूल मिळून आले.

पोलिसांनी दुसºया खोलीची झडती घेतली असता,धान्याच्या पेटीत बंद पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये दोन शस्त्रे मिळून आली. दोन पिस्तुलांचा तपास सुरू असताना, तिसरे पिस्तूल मिळाल्याने, ते कुणाचे याचा तपास सुरू आहे.


Next Story
Share it
Top
To Top