नाशिक पोलीस भरतीमध्ये निवड होण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या शकला लढवल्या जातात. नाशिकमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये पोलीस तपासणीवेळी उंची वाढावी म्हणून एका तरुणानं चक्क बनावट केसांचा विग डोक्याला चिकटवला. किसन पाटील असं या तरुणाचं नाव आहे.
नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पोलीस भरतीवेळी एका तरुणानं आपली उंची 175 सेंमीच्यावर दिसावी यासाठी विग घातला. तपासणीवेळी त्याची उंचीही जास्त मोजली गेली. मात्र एका पोलीस कॉन्स्टेबलला संशय आल्यानं त्यानं किसनची पुन्हा नीट तपासणी केली. यावेळी त्याच्या डोक्यावर विग आढळला आणि त्याचं बिंग फुटलं.