प्रमोशन मिळाले नाही मॅनेजरची आत्महत्या

बेंगळुरू(वृत्तसंस्था): उच्चभ्रु लोकांसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅफे कॉफी डेच्या एका व्यवस्थापकाने प्रमोशन मिळाले नाही म्हणून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रमोद असे या मॅनेजरचे नाव असून तो बेंगळुरूतील चिकमंगळुरू येथील कॅफे कॉफी डे मध्ये काम करत होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आपली वेदना व्यक्त केली आहे.

महादेवपुरा येथे फिनिक्स मॉलमध्ये असलेल्या सीसीडीत प्रमोद काम करत होते. त्याची नुकतीच बदली करण्यात आली. बदली करण्यापूर्वी त्याला प्रमोशनचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्याला प्रमोशन देण्याऐवजी सेल टार्गेट देण्यात आले. तसेच पगार रोखण्याचीही धमकी देण्यात आली होती. या सर्व प्रकाराला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. सीसीडी ही कंपनीम माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांच्या जावयाची आहे.


Next Story
Share it
Top
To Top