नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या राजधानीत महिलांवरील गुन्ह्याची वेगवेगळी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. एअर हॉस्टेसचे शिक्षण घेणा-या २१ वर्षीय तरुणीची भोसकून हत्या झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे.
ईशान्य दिल्लीत मंगळवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे. आदिल नावाचा २१ वर्षीय युवक तरुणीला भोसकताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तरुणीच्या राहत्या घराबाहेर भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. व्हिडिओमध्ये तरुणीचे आरोपीसोबत भांडण होत असल्याचं सुरुवातीला दिसत आहे. त्यानंतर आरोपीने सुरा काढून तिच्यावर वार केले. मारेकºयावर कारचोरीसह आणखी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.