बंदुकीच्या धाकावर बलात्कार

बंदुकीच्या धाकावर बलात्कार

श्रीरामपूर- बंदुकीचा धाक दाखवून अडीच महिन्यांपासून विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आरटीओ कार्यालय परिसरात घडल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून उघड झाले. याप्रकरणी तरुणीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमर पवार, सपना अमर पवार (दोघे सेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीला कामासाठी औषधोपचारांसाठी आरोपींनी आपल्या घरी नेण्याचे आमिष दाखवले. तरुणीच्या घरी येऊन पती घरी नसल्याचे पाहून अमर याने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला.


Next Story
Share it
Top
To Top