बालगृहातील मुलानं केली आत्महत्या

बालगृहातील मुलानं केली आत्महत्या

अकोला-मलकापूर येथील बालगृहात वास्तव्यास असलेल्या एका अठरा वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मित्रांची नजर चुकवून शनिवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास केली.विशेष म्हणजे त्याने वहीत लिहून त्यांच्या मित्रांना आय लव्ह यू असे लिहलेेले आढळले. एकाआजाराने त्रस्त असलेले ५० मुले या बालगृहात राहतात.त्यांचा चांगल्याप्रकारे सांभाळ येथे केल्या जाताे.मात्र शनिवारी अचानक सकाळी एका १८ वर्षीय मुलाने मुलांची नजर चुकवून वरच्या मजल्यावरील खोलीत कपडे बदलण्यासाठी गेला.खोलीमध्ये त्याने एका रुमालाच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेतला.काही वेळानंतर तो खाली न आल्याने मित्रांनी वर जावून बघितले असता खोली आतून बंद होती.काही वेळाने खोलीचे दार उघडल्यानंतर आत युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून अाला.घटनेची माहिती खदान पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.यावेळी त्याच्याजवळ असलेल्या वहीमध्ये त्यांना मित्रांवर माझे खूप प्रेम असल्याचे लिहून ठेवलेले दिसून आले.त्यांच्या अचानक मृत्यूने बालगृहातील त्यांच्या मित्रांना दु:ख अनावर झाल्याने त्यांनी आपल्या लाडक्या मित्राला अखेरचा निरोप दिला.सदर मुलगा काही दिवसांपूर्वी नागपूर येथील आश्रमात होता.त्यानंतर त्याला अकोल्यात दाखल करण्यात आले होते.


Next Story
Share it
Top
To Top