भाजपा नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

मुंबई - मिरा रोड येथील भाजपाचे नगरसेवक आणि प्रभाग समितीचे सभापती अनिल भोसले यांच्यावर काशिमीरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पीडित महिला ही अनिल भोसले याच्या मित्राची पत्नी आहे. दोघांची ओळख होती. पीडित महिला आणि तिच्या पतीची घरगुती कारणावरून भांडणे होत असत. त्यावेळी भोसले समजूत काढत असे. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने पीडित महिलेला ठाणे-नाशिक रोडवरील लॉजवर नेऊन तिच्या मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला. फोटोही काढले आणि हा प्रकार कुणालाही सांगितला, तर फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली, असे या संदर्भात काशिमीरा पोलिसांनी सांगितले.

मात्र हे प्रकार असह्य झाल्यावर पीडित महिलेने पोलिसांकडे भोसले याच्याविरोधात तक्रार दिली. चौकशी करून काशिमीरा पोलिसांनी भादंवि कलम ३७६, ३७७ आणि ५०६ अन्वये अनिल भोसलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Next Story
Share it
Top
To Top