भावाने बहिणीसह तिच्या प्रियकराची केली हत्त्या

भावाने बहिणीसह तिच्या प्रियकराची केली हत्त्या

भोकर तालुक्यातील प्रेमी युगूलाची ही " सैराट फेम " खळबळ जनक घटना

उत्तम बाबळे

नांदेड :- दीड महिन्यापुर्वी लग्न झालेली भोकर येथील विवाहिता लग्न झाल्यानंतरही प्रियकरासोबत संबंध ठेऊन सासरहून पळून गेल्याचा राग मनात धरुन तिच्या सख्ख्या भावाने या प्रेमी युगूलाचा शोध घेऊन महाराष्ट्र - तेलंगणा राज्य सिमेजवळील दिवशी येथे २३ जुलै रोजी तीक्ष्ण हत्त्याराने निर्घुन खून करुन निवघा रस्त्यावरील नाल्याजवळ त्या दोघांची प्रेत फेकून दिले.तसेच या खूनी भावाने हत्त्यारासह भोकर पोलीस ठाण्यात स्वत:येऊन आत्मसमर्पण केले आहे.या " सैराट फेम " घटनेमुळे भोकर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून काही जणांत हळहळ व्यक्त होत आहे.पुजा बाबूराव दासरे (२२) रा.थेरबन ता.भोकर हिचे १० जून २०१७ रोजी जेटीबा हासेन्ना वर्षेवार (२५) रा.जि.प.शाळे मागे,भोकर जि.नांदेड यांच्याशी लग्न झाले होते.परंतू तिचे गेल्या तीन वर्षापासून थेरबन ता.भोकर येथील फोटोग्राफर गोविंद विठ्ठलराव क-हाळे (२५) याच्या सोबत प्रेमसंबंध होते.यामुळे ती लग्नानंतर काही दिवसांनी प्रियकर गोविंद क-हाळे सोबत सासरहून पळून गेली होती.याबाबत तिचा पती जेटीबा वर्षेवार यांनी साै.पुजा जेटीबा वर्षेवार ही दि.२२ जुलै २०१७ रोजी भोकर येथून पहाटे ५:०० वाजता निघून गेल्याची (हरवली आहे) भोकर पोलीसांत तक्रार दिली.तसेच तिच्या माहेरला याबाबद कळविले.हे समजल्याने माहेरच्यांचा राग अनावर झाला.यामुळे पुजा व प्रियकर गोविंद यांचा शोध घेणे सुरु झाले.साै.पुजाचा भाऊ दिगांबर बाबूराव दासरे (२५) याची व गोविंद क-हाळे ची जुनी ओळख आणि मैत्री असल्यामुळे त्या दोघांचा शोध घेणे सहज शक्य झाले.दिगांबर दासरे यांने गोविंद यास फोन करून संपर्क साधला व ते दोघे कुठे आहेत याची माहिती घेतली.हे प्रेमी युगूल तेलंगणा राज्यातील खरबाळा येथे गोविंद च्या बहिणीकडे असल्याचे समजले. यावरुन दिगांबर दासरे हा त्या गावी गेला व त्यांची भेट घेतली. दोघांना समजाऊन सांगून हे प्रकरण मिटवण्याचा त्याने प्रयत्न केला असता बहिणीने त्याचे एैकण्यास नकार दिला.ते दोघेही एैकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याने कसबसे दोघांना भोकरला आणण्याचा प्रयत्न केला व दि.२३ जुलै २०१७ रोजी त्यांना घेवून भोकरकडे येत असतांना त्या दोघांची दिशाभूल तो करत असल्याचे या युगूलाच्या निदर्शनास आले.त्यामुळे त्या दोघांनी सोबत येण्यास नकार दिल्याने दिगांबर दासरेचा राग अनावर झाला व त्याने महाराष्ट्र - तेलंगणा राज्य सिमेवरील दिवशी (बु) पासून ३ कि.मी.अंतरावरील निवघा रस्त्यावरील नाल्या जवळ येताच त्याने सकाळी ११ ते १२:०० वाजताच्या दरम्यान अगोदर गोविंद कराळे याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्त्यार ईळा (कत्ती) ने वार केले. त्यानंतर बहिण पुजा हिच्या गळ्यावर देखील वार केले.गंभीर जखमी झालेल्या या प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू झाला.यानंतर निर्घुन खून केलेल्या निर्दयी भावाने दुपारी २:०० वाजताच्या दरम्यान भोकर पोलीस ठाणे गाठून हत्त्यारानिशी आत्मसमर्पण केले व हा गुन्हा केल्याची स्वत: कबूली दिली.ही खळबळ जनक माहिती प्राप्त होताच भोकर पोलीस ठाण्याचे पो.नि.संदिपान शेळके व त्यांच्या ताफ्याने घटनास्थळ गाठले.दरम्यान भोकरचे अतिरीक्त पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके यांसह आदीजण व निजामाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक विष्णू वारियार,पोलीस उप अधीक्षक ए.रामलू,पो.नि.रमेश तेलंगणा हे घटनास्थळी हजर झाले आणि मयत गोविंद चे प्रेत तेलंगणा राज्यात तर मयत पुजाचे प्रेत महाराष्ट्र राज्य सिमेच्या आत पडल्याने तसेच आरोपी हा भोकर पोलीसांत हजर झाल्याने गुन्हा कुठे नोंदवावा हा वाद निर्णयास काढण्यात आला.त्या सर्वांनी वरीष्ठ अधिका-यांशी कायदेशीर सल्ला घेतला व गुन्हा भोकर येथे दाखल करण्याचे ठरले.त्यानूसार खुनी भाऊ दिगांबर याने दिलेल्या कबूली जबाब व फिर्यादीवरुन भोकर पोलीसात निर्घुन खून केल्याचा त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिणीचे सासर व माहेर या दोन परिवाराची ईभ्रत त्यांनी चव्हाट्यावर आणली व समाजातील प्रतिष्ठा संपविली याचा राग अनावर झाल्याने या निर्दयी भावाने " सैराट फेम " त्या दोघांचा खून केल्याचे पोलीसात सांगीतले असून या दुहेरी खून प्रकरणाचा पुढील तपास पो.नि.संदिपान शेळके, पो.उप.नि.सुशिलकुमार चव्हाण,जमादार जाधव व पत्रे हे करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top