भोकर तालुक्यातील एका आदिवासी मुलीची मध्यप्रदेशात विक्री

भोकर तालुक्यातील एका आदिवासी मुलीची मध्यप्रदेशात विक्री

उत्तम बाबळे

नांदेड :-एका महिलेच्या मध्यस्थीने मजुरीला लावण्याचे अमिष देऊन आमदरीवाडी ता.भोकर येथील एका १९ वर्षीय आदिवासी गरीब मुलीला मध्यप्रदेशात विकण्यात आले.खरेदीदारांनी तेथील एका मुलासोबत जबरदस्तीने लग्न करून दिली त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना समोर आली .याप्ररणी मध्यस्थी महिलेसह पाच जणा विरुद्ध भोकर पोलीसात बलात्कार व अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदरीवाडी येथील एका १९ वर्षीय मुलगी हालाखीच्या परिस्थितीमुळे मोल मजूरी करून स्वत:ची व कुटूंबीयांची उपजिवीका करत होती. तिने गावातील शोभाबाई शेकूराम मेंडके या महिलेला काम लावण्याची विनंती केली. त्या महिलेने काम लावते नंतर भेट म्हणून सांगितले. ५ मे रोजी सकाळी ती मुलगी त्या महिलेकडे कामासाठी गेली असता शोभाबाई मेंडके ही गावातील अ‍ॅटोरिक्षा थांब्यावर एका पुरुषासोबत बोलत होती. त्या दोघांनी तुला नांदेड येथे काम देणार आहोत म्हणून दुचाकीवर नांदेडला नेले.जाताना तिने त्या व्यक्तीचे नाव विचारले असता त्याने आपले नाव विठ्ठल दत्तराम राखोडे रा. शेंबोली ता.मुदखेड असे सांगितले. या दोघांनी तिला दत्तनगर नांदेड येथील सीताराम एकनाथ सूर्यवंशी यांच्या घरी नेले. तेथे मुलीस सोडून ती महिला निघून गेली. दोन दिवस तिला सूर्यवंशीच्या घरातील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. यानंतर दि.७ मे २०१७ रोजी रात्री १:३० वाजताच्या दरम्यान शोभाबाई, विठ्ठल व सिताराम या तिघांनी तिला तुझ्या बहिण भावास जीवंत मारून टाकू अशी धमकी देत आमच्या सोबत देवदर्शनाला चल म्हणून कार क्र.एम.एच.२६ व्ही.३१९२ मध्ये बसऊन शिर्डी येथे नेले.शिर्डी येथे एका मुलासोबत त्या सर्वांनी तिचा विक्री सौदा करून त्याच्यासोबत बनावट लग्न लावण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने विरोध केला असता त्या मुलाला तिचे आई वडील सोबत नसल्याची खात्री झाल्याने त्याने लग्नास नकार दिला. यामुळे तिला परत नांदेड येथे आणण्यात आले. तसेच एका ट्रॅव्हल्सद्वारे तिला विठ्ठल व सीताराम यांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत आम्ही दोघे मामा व मेव्हुणा असल्याचे सांगण्याचा दबाव टाकून जबरदस्तीने मध्यप्रदेशात नेले. मध्यप्रदेशातील शेगवा या गावातील मोहणाजी छगनलाल मोड यांच्याकडू पैसे घेऊन तिची विक्री करण्यात आली व मोहणाजी मोडचा मुलगा पवन याच्या सोबत तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आले.ते दोघे परत निघून आले. यानंतर पवन मोड याने जीवे मारण्याची धमकी देत तिच्या मनाविरुद्ध जाऊन जबरदस्तीने सतत काही दिवस बलात्कार केला व घरातच डांबून ठेवले.ही मुलगी गावात नसल्याचे निदर्शनास आल्यावरून ती हरवली असल्याची नोंद भोकर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी सुत्रे हलवली असता याच दरम्यानच्या काळात तिने पवन आणि मोहणाजी यांची नजर चुकवून त्यांच्या मोबाइलवरून मामाचा मुलगा राजकुमार वाकदकर यास यासंबंधी माहिती दिली.पोलीसांचा ससेमिरा मागे नको म्हणून मोड कुटूंबीयांनी विठ्ठल व सिताराम यांना बोलावून घेऊन तिला त्यांच्या स्वाधिन केले.२ जुलै रोजी त्या दोघांनी कोणाला सांगतली तर सर्वांना जीवे मारुन टाकू अशी धमकी देऊन नांदेड येथे सोडून दिले. तीने ६ जुलै रोजी भोकर पोलीसात फिर्याद दिल्यावरुन शोभाबाई,विठ्ठल,सिताराम,मोहणाजी व पवन विरुद्ध भोकर पोलीसात अमिष दाखऊन पळवून नेणे,बलात्कार व अॅट्राॅसिटी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास अर्धापुर,नांदेड ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील,भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके,पो.नि.संदिपान शेळके न भोकर पोलीस करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top