आरोपीच्या नातलग महिलांचा पोलिसांवर हल्ला बोल

गौतम वाघ

उल्हासनगरात आरोपीच्या नातलग महिलांचा पोलिसांवर हल्ला बोल आरोपीला पळून जाण्यास सहकार्य, अनेक महिलांवर गुन्हा

उल्हासनगर-घरफोडीच्या गुन्ह्यात हव्या असलेल्या आरोपीला पोलीस पकडण्यासाठी गेले असता, आरोपीच्या नातलग महिलांनी चक्क पोलिसांवरच हल्ला बोल करून धक्काबुक्की,मारहाण,दगडफेकीचा प्रकार केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.त्यामुळे आरोपी हातचा निसटून गेला आहे.या प्रकरणी अनेक महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल काळे उर्फ बबल्या याला ताब्यात घेण्यासाठी काल दुपारी मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस,पोलीस निरीक्षक शशिकांत मेहेर,सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भिसे,आदी पोलिसांचे पथक डंपिंग ग्राउंड जवळील वसाहतीत गेले होते.तेंव्हा बबल्या याला पोलिसां पासून वाचवण्यासाठी महिलांनी पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांना मारहाण व दगडफेक करण्यास सुरवात केली.यासंधीचा फायदा घेऊन बबल्याने पळ काढला.याप्रकरणी पोलीस हवालदार रामचंद्र जाधव यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अनेक महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष म्हस्के तपास करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top