महिला पोलिसांची आत्महत्या

सोलापूर येथे दोन महिला पोलीस कर्मचारी आत्महात्या केल्याची घटना समोर आली आहे. एक महिला शहर पोलिस कर्मचारी तर दुसरी महिला ग्रामीण पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. राहत्या पोलीस कॉर्टरमध्ये या दोघींनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

विजयालक्ष्मी शिवप्पा बिराजदार (वय 22) असं कविता नगर पोलीस लाइनमध्ये राहणाऱ्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. तर पोलीस मुख्यालयात राहणा-या चारुशिला बंगाळे (32)यांनीही आत्महत्या केली आहे.

प्रकरणातील आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.


Next Story
Share it
Top
To Top