महिलेवर शिंदवणे घाटात सामुहिक बलात्कार

महिलेवर शिंदवणे घाटात सामुहिक बलात्कार

पुणे – केडगाव परिसरात राहणारी महिला नारायणपूरला देवदर्शसनासाठी गेली होती. दर्शन झाल्यानंतर परतीच्या मार्गावर असतांना फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या दोघांनी तिच्यावर शिंदवणे घाटात नेऊन सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. देवदर्शनाहून परतत असतांना उशीर झाल्यानं पारगाव चौफुला इथं गाडीची वाट पाहत असतांना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय.

पीडित महिला केडगाव परिसरातील राहणारी आहे. ती नारायणपूरला देवदर्शनासाठी गेली होती. घरी येण्यासाठी रात्री उशीर झाल्यानं पारगाव चौफुला येथे ती उभी होती. यावेळी फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला व नंतर घाटामध्ये सोडून दिलं. पीडित महिलेनं घाटातून प्रवास करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांच्या मदतीनं फॉर्चुनर गाडीचा नंबर मिळविला आणि लोणी-काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.


Next Story
Share it
Top
To Top