माहुरमध्ये १३ लाखांची दारू जप्त

माहुरमध्ये १३ लाखांची दारू जप्त

उत्तम बाबळे

नांदेड :- नांदेड जिल्ह्याचा पदभार स्विकारतांना पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी अवैद्य धंदे व धंदेवाल्यांचा मी स्वच्छता मोहिम राबविणार म्हटले होते.त्याचा प्रत्यय प्रतिदिन जिल्ह्यात होत असलेल्या कारवाईतून दिसून येत अाहे. ५ जून रोजी त्यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाने माहूर व तालुक्यात एकाच दिवशी चार ठिकाणी छापे मारुन अवैद्य दारु व गुटखा असा एकूण १३ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आणि काही विक्रेत्यांना अटक केली असल्याने सदरील धाडसी कारवाईमुळे अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणानले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर वरची दारु दुकाने बंद करण्यात आली.ही दुकाने बंद करतांना सदरील दुकानदारांनी विक्रीसाठी उपलब्ध असलेला त्यांच्याकडील साठा ठोक विक्रेत्याकडे जमा केला व आपल्याकडे काहीही शिल्लक नाही अशी नोंद राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे केली.तर तंबाखू उत्पादनांवर राज्यात बंदी घालण्यात आल्यामुळे गुटखा विक्रीस बंदी आहे.असे असले तरी स्थानिक पोलीस,राज्य उत्पादन शुल्क विभाग व अन्न व औषधी प्रशासन यांच्या मुक संमत्ती तथा वरद हस्ताने जिल्ह्यात राजरोसपणे अवैद्य दारु आणि गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे सर्वश्रुत आहे. याच अनुशंगाने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांना माहूर तालुक्यात अवैद्य दारु व गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली.त्यामुळे त्यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथाचे प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोळकर यांची साप्ताहिक सुट्टी रद्द करुन बोलाऊन घेतले व कारवाईचे आदेश दिले.त्या आदेशानूसार सहा.पो.नि.ओमकांच चिंचोळकर व पोलीस कर्मचा-यांच्या या विशेष पथकाने ५ जून ,२०१७ रोजी माहूर येथील बंद असलेल्या परंतू जादा दराने अवैद्यरित्या दारु विक्री करत असलेल्या विहार बार वर छापा टाकला असता त्यांना तेथे ४६ प्रकारच्या विविध कंपनीची विदेशी दारू व बियर असा ०६ लाख ७३ हजार २४७ रुपये किमतीचा अवैध दारुचा साठा मिळाला.या बारचा मालक रामचंद्र धुमय्या कोलावार रा. पुसद रोड माहूर यास अटक केली व तो साठा जप्त करुन त्याच्या विरोधात माहूर पोलीसांत गुन्हा दाखल केला. कर्नाटक व तेलंगणा राज्यातून तस्करीच्या माोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा जिल्ह्यात येत असून माहूर शहर व परिसरात अवैध रित्या तो विक्री करण्याचे एक केंद्र मोहम्मद कलीम मोहम्मद खलील(२८) रा.पुसद रोड माहूर हा चालवितो अशी माहिती मिळाल्यावरुन पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर व पथकाने त्याच्या घरी छापा मारुन घराच्या बाहेरच्या बाजुला असलेल्या शेडमध्ये सर्वच कंपनीच्या गुटख्याची पोते मोठ्या प्रमाणात मिळाली. हा गुटखा जवळपास ५ लक्ष रुपये किमतीचा असून तो जप्त केला आहे.या अवैद्य विक्रेत्त्या विरोधात माहूर पोलीसात गुन्हा दाखल केला असुन,तो मात्र फरार झाला आहे.तसेच मांडवी व सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी दारु मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या विक्री होत असल्याचे समजल्यावरुन या पथकाने मांडवी व सिंदखेड येथे अवैद्य देशी दारु विक्री करत असलेल्या अनुक्रमे पुंडलीक हरी राठोड व कुंडलीक राठोड यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपये असा ५० हजार रुपयाची विक्रीसाठी साठवलेली अवैद्य देशी दारु जप्त केली आणि त्यांच्या विरोधात मांडवी व सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख ओमकांत चिंचोळकर व हे पथक अवैद्य धंदेवाल्यांचे कर्दनकाळ ठरत असून अशा अपप्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणानले आहे,तर एकाच दिवशी करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईतून राबवित असलेल्या या स्वच्छता मोहिमेविषयी पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा व या पथकाचे शांतताप्रिय नागरिकांतून काैतूक होत असून अनेकांनी अभिनंदन केले आहे.


Next Story
Share it
Top
To Top