माहूरमध्ये ३ लाख ९८ हजाराच्या मुद्देमालासह ७ जणांना अटक

माहूरमध्ये ३ लाख ९८ हजाराच्या मुद्देमालासह ७ जणांना अटक

माहूर व किनवट येथील " ते ? " पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या रडारवर

उत्तम बाबळे

नांदेड :- माहूर येथील दत्त शिखराकडे जाणा-या मातृतीर्थ रस्यावरील जंगलातील जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ५ जुलै रोजी छापा मारला व या कारवाईत ३ लाख ९८ हजार रुपयाच्या मुद्देमालासह ७ जुगा-यांना जेरबंद केले असून फरार झालेल्या अन्य ७ अशा १४ जुगा-यांविरुद्ध माहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर विशेष पोलीस पथकाने माहूर व किनवट तालुक्यात सर्वाधिक कारवाया केल्या असून हे दोन तालुके अवैध धंद्यांचे माहेर घर असल्याचे निदर्शनास आल्याने अवैध धंदेवाल्यांशी हातमिळवणी करणारे " ते ? " पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या रडारवर असल्याने त्यांच्या विरुद्ध काय कारवाई होणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

विशेष पोलीस पथक प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्याचे सहकारी पोलीस कर्मचारी, लाठकर,जगताप,वानखेडे,कुलकर्णी,पायनापल्ले,निरणे,जिंकलवाड,गंगुलवार, आवातिरक आणि चालक देवकत्ते यांना गुप्त माहिती मिळाल्यावरुन ५ जुलै २०१७ रोजी माहूर येथील दत्त शिखराकडे जाणा-या मातृतीर्थ रस्त्यावरील जंगलात १ कि.मि.अंतरावर चालू असलेल्या जुगार अड्यावर साफळा रचून दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान छापा मारला असता तेथे पत्त्यांचा जुगार खेळतांना जुगारी दिसले.त्यांना पकडत असतांना ७ जण हे जंगलातील रस्ते माहित असल्याचा फायदा व झाड झुडपांचा आधार घेऊन पलायन करण्यात यशस्वी झाले.तर ७ जणांना जेरबंद करण्यात पथकास यश आले.यावेळी त्या जुगा-यांकडील जुगार साहित्यासह रोख २७ हजार ५०० /- रुपये,चार दुचाकी व एक तीन चाकी अॅटो रिक्षा असा एकूण ३ लाख ९८ हजार ५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच जेरबंद केलेल्या शे.सत्तार शे.लाल, शे.अश्फाक शे.मुनाफ रा माहूर, शे.इसराइल शे.मुसा, सतीश प्रकाश कांबळे रा. सारखनी, संदीप संजय राठोड रा. माहूर . तर पलायन केलेल्या शे.अमिन शे.इमान,शे.इम्रान शे.उस्मान, शे.तौफीक शे.इसराल ( जुगार अड्डा चालक ) ,शे.फिरोज शे. इसाक सर्व रा.माहूर व इमरान वडसा ता.माहूर,शे. बाबा,मुजीब बेग, प्रतिक कांबळे,परेश बोरकर, माहूर या १४ दणांविरुद्ध सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माहूर पोलीसांत मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणा राज्य सिमेवरील किनवट व विदर्भ सिमेवरील माहूर हे दोन तालुके अवैध धंद्याचे केंद्र झाल्याचे एकूण कारवाईतून दिसत आहे.हे केंद्र उघडकिस आणना-या सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर व पथकातील पोलीस कर्मचा-यांचे काैतुक होत असून " त्या ?" अवैध धंदे वाल्यांना अभय देणारे " ते? " पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या रडारवर असल्याने ते काय कारवाई करणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


Next Story
Share it
Top
To Top