मुखेडमध्ये अवैध धंद्यावर छापे १२ लाखांचा ऐवज जप्त

मुखेडमध्ये अवैध धंद्यावर छापे १२ लाखांचा ऐवज जप्त

उत्तम बाबळे

नांदेड : विशेष पोलीस पथकाने १० जुलै रोजी मुखेड येथील दोन मटका जुगार अड्डे व दोन अवैध दारू विक्री करणा-या चार ठिकाणी छापे मारून १२ लाखांचा ऐवज जप्त केला तसेच २६ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी गंगा लॉज येथील मटका जुगार अड्ड्यावर पहिला छापा मारला व यात कल्याण नावाचा मटका जुगार खेळत असलेल्या शे. अवेज जिलानी, रमेश कांबळे, शेख अलाऊद्दीन शेख व शे. मिया बाशा सहाब या चार जणांच्या मुसक्या आवळल्या. अन्य एका मटका जुगार अड्ड्यावर दुसरा छापा मारला. यात मटका जुगार खेळणारे व खेळविणारे व्यकंट पुजारी, तुकाराम धोतरे ,शिवाजी डुमने, संग्राम पोटफोडे, पिराजी दंडलवार, बापुराव बोडके, गोंविद कराळे ,मरीबा दंडलवार, राम जाधव, यल्लपा गुंजाळे, साहेबराव दंडलवाड, नागनाथ लामतुरे या १२ जणांसह त्यांच्या जवळील जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण ५० हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच या नंतर पथकाने छापा सत्राचा मोर्चा अवैध दारु विक्री करणा-या केंद्राकडे वळविला व पहिल्या छाप्यात अवैध दारु विक्री करणारे बालाजी भांगे,व्यकंट चिंतलवाड व सुनिता कागे या महिलेसह १७ हजार ४०० रुपयाचा रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर मुखेड मधील नरसी रस्त्यावरील हॉटेल चंद्रमा येथे दुसरा छापा मारला.


Next Story
Share it
Top
To Top