मुलाला घेवून आई बेपत्ता

मुलाला घेवून आई बेपत्ता

पनवेल : पनवेल शहरातील एक महिला आपल्या तीन वर्षाच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेवून जाते असे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप घरी न परतल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ज्योती स्वप्नील स्वामी (24) रा.सिद्धी विनायक कॉम्प्लेक्स, प्लॉट नं.410 पनवेल या आपला तीन वषार्चा मुलगा आराध्य याला हॉस्पिटलमध्ये घेवून जाते असे सांगून घराबाहेर पडली ती अद्याप घरी परतली नाही. तीची उंची 5 फूट 1 इंच, रंग गहुवर्णीय, नाक सरळ, केस काळे व कुरळे, एक वेणी, अंगात निळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीझ जँन्ट घातलेली आहेत तसेच पायात सँण्डल घातलेले आहे. तिला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. तीच्या मुलाच्या अंगावर लाल रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली आहे.


Next Story
Share it
Top
To Top