मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी अटक

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी अटक

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोका लावलेल्या आणि दरोडा, चोरी अशा अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या तरुणाला बारामती येथून जेरबंद केले आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली. जाधव यांनी सांगितले की, याप्रकरणी प्रवीण मारुती दरेकर (वय २३, रा. सणसवाडी, खंडोबाची आळी, ता. शिरुर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. शिरुर तालुक्‍यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घोळवे, हवालदार विद्याधर निचित, बाळासाहेब सकाटे, निलेश कदम, अतुल डेरे, चालक विघ्नहर गाडे, सचिन मोरे हे पोलीस पथक गेले. अनेक महिने प्रवीण दरेकरच्या मागावर होते. परंतु तो सापडत नव्हता. विश्वसनीय खबऱ्याकडून या पोलीस पथकाला प्रवीण बारामती शहरात येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार या पथकाने बारामतीतील हॉटेल निलम पॅलेससमोर सापळा रचला होता. प्रवीण तेथे येताच त्याला तातडीने जेरबंद करण्यात आले. प्रवीण दरेकरवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर चोरी, दरोडा, जबरी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात पुढील तपास हवेलीच्या उपविभागीय अधिकारी आधिकारी डॉ. वैशाली कडूकर पुढील तपास करीत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top