रेती तस्करी करणा-या सात ट्रकसह १ कोटी ४ हजाराचा मुद्देमाल जप्त 

रेती तस्करी करणा-या सात ट्रकसह १ कोटी ४ हजाराचा मुद्देमाल जप्त 

उत्तम बाबळे

नांदेड :-पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने आज पर्यंत मारलेल्या छाप्याच्या नोंदीनूसार १३ जून रोजी केलेली कारवाई ही सर्वात मोठी असून देगलूर तालुक्यातील रेती घाटांवरुन बनावट पावतीच्या आधारे शासनाचा महसूल बुडऊन रेतीची तस्करी करणारे सात ट्रक ५० ब्रास रेतीसह पकडले आहेत.यात १ कोटी ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून देगलूर पोलीसांत त्या ट्रकच्या चालक मालक अशा १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष पोलीस पथकाचे प्रमुख सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर, आणि त्यांच्या पथकातील सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर, जगताप, खंदारे, पायनापल्ले, निरणे, आवातिरक आणि चालक देवकत्ते हे सर्व जण १३ जून २०१७ रोजी देगलूर - नांदेड रस्त्यावर गस्तीवर असतांना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की देगलूर तालुक्याती नद्यांच्या रेती घाटावरुन राज्य व पर प्रांत कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या रेतीची तस्करी होत आहे.यावरुन या पथकाने पाळत ठेवली असता दुपारच्या दरम्यान शेकापूर रस्त्याकडून एकामागे एक असे ०७ ट्रक रेती भरुन घेऊन येतांना दिसले.हे ट्रक अडऊन चाैकशी केली असता.त्या ट्रक चालकांकडे काही खाडाखोड केलेल्या व शिक्के मारलेल्या पावत्या मिळाल्या.या पावत्यांच्या क्रमांकाची चाैकशी पुणे गाैण खणीज विभाग कार्यालयाकडे केली असता.त्यावरील शिक्के असलेल्या रेती ठेकेदाराची नोंद त्यांच्याकडे आढळली नाही व महसूल खात्याकडे नोंद पाठविणा-या एस.एम.एस.चा बारकोड देखील जुळून आला नसल्याचे पुणे गाैण खणीज विभागाने कळविले.यावरुन असे निदर्शनास आले की बनावट पावत्यांचा वापर करुन शासनाची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणात अवैद्यरित्या रेतीची तस्करी केली जात आहे.यामुळे पथकाने रेतीने भरलेले ते ७ ट्रक रेतीसह ताब्यात घेतले.तसेच रेती व ट्रक असा एकूण १ कोटी ४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच या पथक प्रमुखांनी फिर्याद दिल्यावरुन त्या ट्रकच्या ७ चालक व ६ मालकाविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३७९, ३३६ आणि ३४ भादवि प्रमाणे देगलूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या ट्रक मालकात एम.डी.मिनाज रा.राजेशुर जिल्हा बिदर, बबलू शेट रा.बिदर, जगदिश बिरादार आणि इब्राहिम रा.होमनाबाद जि.बिदर, सलमान खान आणि नरसिंह कुलकर्णी रा.बिदर याचा ,तर ०७ चालकांत संदीप भगवान गिरी (वय-२८) रा.जि.लातूर, कैलास गिरी देवगिरी गौस्वामी (वय २८) रा.बिदर, बाबू वैजनाथ सनाफ (वय-३७) रा. बिदर, रवि टिकाराम चौहाण(२५) रा.बिदर, अब्दुल रहेमान युसमानसाहब (वय-५८) रा.बिदर, शेख सलीम शेख पिरमहमद (वय-३०) रा.देगलूर, बजरंग नारायण राठोड (वय-२९) रा.मुखेड यांचा समावेश आहे. हे विशेष पोलीस पथक स्थापन झाल्या पासून गेल्या १५ दिवसात सतत केलेली कारवाई ही यशस्वीच झालेली असून ही कारवाई आजपर्यंतच्यात सर्वात मोठी आहे.अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणानलेले असतांना राज्य महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून बनावट पावत्यांच्या आधारे लाखो रुपयाचा महसूल बुडविणारे व रेतीची तस्करी करणारे रॅकेट या पोलीस पथकाने उघडकीस आणले आहे.याबाद त्यांचे काैतुक होत असून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या नांदेड जिल्हाधीकारी अरुण डोंगरे यांनी या गंभीर बाबीकडे अधीक लक्ष घालून त्या अवैद्यरित्या रेतीची तस्करी करुन शासनास गंडविणा-या रॅकेट आणि रॅकेटला मदत करणारे काही महसूल कर्मचारी यांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध योग्य ती कठोर कारवाई करावी अशी नागरीकांतून चर्चा होत आहे.


Next Story
Share it
Top
To Top