लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने 72 तासात केला हत्येचा उलगडा

लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने 72 तासात केला हत्येचा उलगडा

[embed]https://youtu.be/0hPJxgjaf1c[/embed]

कल्याण -दोन दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नंबर 6-7च्या खाली एका इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती .या हत्येनंतर आरोपी पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता .सदर आरोपी सचिन म्हस्के याला बुलढाणा येथून अटक केली आहे .

जीवापाड प्रेम करणारी प्रेयसी पुन्हा पतीकडे निघून गेल्याने संतापलेल्या प्रियकराने तिच्या पतीचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडला होता . संतोष पुजारी हा भंगार गोळा करण्याचे काम करत होता . काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती . या दरम्यान संतोष च्या पत्नीचे संतोष चा मित्र सचिन म्हस्के याच्याशी प्रेम सबंध जुळले होते . दरम्यान संतोष कारागृहातून सुटून आल्यानंतर त्याच्या पत्नीने सचिनची साथ सोडून पुन्हा संतोष सोबत संसार थाटला .जीवा पाड प्रेम केलेल्या प्रेयसीने साथ सोडल्याने सचिन ला संतोष चा राग आला होता याच रागाच्या भरात 3 तारखेला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सचिनने संतोष ला कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 6 व 7 स्कायवॉक च्या खाली गाठत झोपेतच त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करत त्याची हत्या केली . याबाबत जी आर पी ला माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेत तपास सुरू केला .

रेल्वे स्थानकातील फुटेज तपासले असता सदर आरोपी पळून जात असताना दिसला सचिन म्हस्के नावाचा हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी हि 7 गुन्हे नोंद आहेत .सीसीटीव्ही फुटेज मध्ये संतोश शेजारी एक महिला झोपलेली आढळून आली ती लातूर एक्स्प्रेस मध्ये चढताना दिसून आली .पोलिसांनी या महिलेला तपासकामी ताब्यात घेत चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार कथन केला पोलिसांनी सचिन म्हस्के चा शोध सुरु करत त्याला बुलढाणा येथील खट्याळ गव्हाण या गावातून अटक केली आहे .


Next Story
Share it
Top
To Top