वाशिम जिल्हा कृषी विकास अधिकारी धापाते लाच घेतना रंगे हात अटक

विनोद तायडे

वाशीम-वाशिम जिल्ह्या परिषद जिल्हा कृषी विकास अधिकारी

आबा गेनबा धापाते यांना

एचडीपीई पाईपचे 17 लाख रूपयाचे बील काढण्यासाठी लाच घेत असताना रंगे हात अटक एसीबीने केली आहे .

या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एचडीपीई पाईप तयार करणार्‍या कंपनीने वाशीम जिल्हा परिषद ला 2016 ला पाईप पुरवठा केला होता. त्याचे जवळपास 17 लाख रूपयाचे बील काढण्याकरीता 19 टक्के प्रमाणे 3 लाख 20 हजार रुपये रक्कमेची मागणी करीत असल्याची तक्रार तक्रारकर्त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. शेवटी 16 टक्के 2 लाख 74 हजार रुपये प्रमाणे देण्याचे निश्‍चित झाले. आबा धापते यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराची लाच स्वीकारली नाही. पण तक्रारदाराकडून आपण लाच मागतल्याचे त्यांनी माण्य केल्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 1988 कलम 7, 15 क्रमाने गुन्हा दाखल करत धापते यांना ताब्यात घेतले. सदर कार्यवाही महेश चिमटे पोलिस अधीक्षक,विलास देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती,आर व्ही गांगुर्डे पोलिस उपअधीक्षक वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन बी बोर्हाडे व त्यांच्या पथकाने केली


Next Story
Share it
Top
To Top