वाशिम दलित महिला हत्याकांडाच्या निषेधार्थ बसपाचा मोर्चा

वाशिम दलित महिला हत्याकांडाच्या निषेधार्थ बसपाचा मोर्चा

विनोद तायडे

वाशिम- वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठेगाव येथील दलित महिलांवर बलात्कार करून जाळून मारल्याच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीचा विशाल मोर्चा आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला .

मोठेगाव येथील दलित महिलेवर त्याच गावातील रणजित देशमुख सह 6 नराधमाणे रात्रीच्या सुमारास संगीता मोरे या विवाहितेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला .वाच्यता होवु नये म्हणून तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत पेटवून दिले . पीडिताने 1 महिना मृत्यूशी झुंज दिली अखेर दि 6 मार्चला तिची प्राणज्योत मावळली पोलिसांनी आरोपीना 1 महिना पाठीशी घातले पिडीतेच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक झाल्याने पोलिसांनी घटनेतील आरोपी रणजित देशमुख याला अटक केली .उर्वरित आरोपीना अटक करावी, तपासात हयगय करणाऱ्या पोलीस अधिकाऱयांना निलंबित करून सहआरोपी करावे,आरोपीना फाशी देण्यात यावी आदि मागण्यार्थ बहुजन समाज पक्षाने प्रदेश महासचिव संदीप ताजने,जिल्ह्याध्यक्ष अविनाश वानखडे यांच्या नेतृत्वाखाली दि 17 मार्चला विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.मोर्चामध्ये हजारो महिला ,पुरुषाचा सहभाग होता


Next Story
Share it
Top
To Top