वाशिम येथील दरोडेखोर अटक

विनोद तायडे

वाशिम :

वाशिम जिल्हा 3 महिन्यापासून दरोडेखोरामुळे हादरला होता दरोडेखोरांचा तपास लावण्याचे आव्हान वाशिम पोलिसांसमोर उभे राहले अखेर स्थानिक गुन्हे शाखेने वाटमारीचा तपास लावून टोळीला जेरबंद केली

जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या घटनेचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली. गुन्हे शाखेने डिजीटल तंत्राच्या सहायाने तपास सुरु केला़ पुणे जिल्ह्यातील चाकन,तळेगाव दाभाडे परिसर पिंजून काढल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून या टोळीला जेरबंद करण्यात या पथकाला यश आले़....

वाशीम तालुक्यातील प्रभु उर्फ हनुमान गोरे, तुकाराम गोरे, नितीन हिवराळे, काशिनाथ गोरे, सुनील कंकाळ तसेच रिसोड तालुक्यातील वाकद येथील प्रमोद काशिराम मुके यांना शेगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाखाच्यावर मुद्देमाल जप्त केला आहे तसेच चोरट्यांनी मालेगाव,मंगरुळपीर तसेच वाशीम तालुक्यात वाटमारी केल्याची कबुली दिली़

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक किरणकुमार साळवे यांच्या पथकाने केली


Next Story
Share it
Top
To Top