पोलिसांनी केली एकास अटक
सामूहिक बलात्कार झाल्याचा पित्याचा आरोप
विनोद तायडे
वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोठेगाव येथे पतीपासून विभक्त राहणाऱ्या 32 वर्षीय दलित महिलेला गावातील रणजित देशमुख याने विनयभंग करून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि 7 फेब्रुवारीला रात्री 11:30 वाजताच्या सुमारास घडली . याप्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये भादवी 307, 354, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांवये गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन पीडितेला पुढील उपचारार्थ अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले .अखेर दि 6 मार्च ला तिचा मृत्यू झाल्याने रिसोड पोलीस स्टेशनला भादवी 302,452 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपी रणजित देशमुख याला अटक करण्यात आली आहे .
वाशिम जिल्ह्यातिल रिसोड तालुक्यातिल मोठेगाव येथे 7 फेब्रूवारिला एका महिलेचा गावातील रणजित देशमुख याने रात्री 11:30 वाजताच्या सुमारास घरात प्रवेश केला महिलेचा विनयभंग करून रॉकेल टाकून जाळले होते या प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनला 12 फेब्रुवारि ला रणजित देशमुख विरुद्ध गुन्हा दाखल केला होता,मात्र त्यास अटक करण्यात आली नव्हती.पीडित महिलेचा 6 मार्च ला दुपारी 4 वाजता मृत्यू झाला. मृतक महिलेच्या पित्याने 7 नराधमानी बलात्कार केल्याचा आरोप पोलीस अधिक्षकाना दिलेल्या निवेदनातून केल्याने एकच खळबळ उडाली आहे
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षकानी रिसोड शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला .दि 7 फेब्रुवारीला पोलीस बंदोबस्तात मृतक महिलेचे शव विच्छेदन रिसोड येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले.रिसोड शहराला पोलीस छावणीचे रूप आले.पोलिसांनी आरोपी विरुद्ध नव्याने भादवी 302,452 कलमानुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपीला त्वरित अटक केली असून अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे , पोलीस उपविभागीय अधिकारी तळ ठोकून आहेत.पोलीस अधिकाऱयांनी सदर प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास स्पस्ट नकार दिला आहे. मृतकाच्या पित्याने 7 नराधमाने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केल्याने पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे