नवी मुंबई- मुंबई पोलिसांकडून व्ही आय पी मोबाईल नंबरच्या नावाखाली लोकांकडून लाखो रूपये उकळणा-या दोन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनुक्रमे संजय प्रजापती वय 24, नरेंद्र कुशवाह वय 22 असून त्यांच्याकडून 8 मोबाईल फोन्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर आरोपी हे एअरटेल कंपनीचे बनावट अधिकारी बनून सोशल मिडीयाद्वारे लोकांपर्यंत पोहोचत असत आणि त्यांच्याकडून व्ही आय पी मोबाईल नंबर देऊ करण्याचे आमिष दाखवून लाखो रूपये उकळत. तसेच महाराष्ट्रासोबत तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्ऩाटक राज्यातही सदर आरोपींनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे.अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.