शिक्षणाधिकारी सविता बिरगे चार लाख लाच घेताना रंगे हात अटक  

शिक्षणाधिकारी सविता बिरगे चार लाख लाच घेताना रंगे हात अटक  

उत्तम बाबळे

नांदेड:- दोन शिक्षीकांचे थकीत वेतन काढण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रभारी शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे यांना ४ लाख रुपयाची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडच्या पथकाने ७ एप्रिल रोजी रंगेहात पकडले असून काही दिवसापूर्वीच समाज कल्याण अधिकारी खामितकरयांना अटक झाल्याचे प्रकरण ताजे असतांनाच हा दुसरा एक मोठा अधिकारी या साफळ्यात अडकल्याने नांदेड जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. नांदेड जि.प. शिक्षण विभागांतर्गत सेवा कार्यरत असलेल्या दोन शिक्षीकांची सेवा सन २००६ ते २००८ या कार्यकाळात काही कारणाने खंडीत होती.म्हणून या कार्यकाळातील वेतन व भत्ता अनुक्रमे ६,२२,०००/- व ६,४९,०००/- असे एकूण १२,७१,०००/-रुपये येणे शिल्लक होते. ते अदा करण्यासाठी या दोन महिला शिक्षीकांनी जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग नांदेड यांच्याकडे रितसर मागणी अर्ज केला होता. हे थकीत वेतन व भत्त्यापोटीची दोघींची एकूण रक्कम काढण्यासाठी नांदेड जि.प.शिक्षण (माध्यमिक) विभागाच्या लोकसेविका प्रभारी शिक्षणाधिकारी ( वर्ग १ ) सविता सिदगोंडा यांनी दोघींनी प्रत्येकी २ लाख ,असे ४ लाख रुपये द्यावेत अशी मागणी केली.ही रक्कम देण्याचे या दोन शिक्षीकांनी मान्य केले.यामुळे ती खंडीत वेतन व भत्त्याची रक्कम काढण्यात आली.आणि याबाबद दि.३० मार्च २०१७ रोजी दोघींनी लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभाग नांदेड यांच्याकडे तक्रार केली.त्या अनुशंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड च्या अधिकारी व कर्मचा-यांनी २ एप्रिल २०१७ रोजी पंचासमक्ष लाच मागीतल्याची खातरजमा केली.यात लाच मागीतल्याची बाब निदर्शनास आली.त्यानुसार ७ एप्रिल २०१७ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड चे पोलिस अधिक्षक संजय लाठकर,उप अधिक्षक संजय कुलकर्णी,उत्तम टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.दयानंद सरवदे,महिला पो.नि.संगीता पाटील,जमादार नामदेव सोनकांबळे,पो.ना.सय्यद साजीद,पो.ना.शेख चाँद,महिला पो.ना.रत्नपारखे,पो.काॅ.विलास राठोड,ताहेर फहाद खान,चालक शेख मुजीब यांच्या पथकाने दि.७एप्रिल २०१७ रोजी सकाळी जि.प.शिक्षण विभाग कार्यालयात साफळा रचून प्र.शि.अ.सविता सिदगोंडा बिरगे यांना ४ लाख रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले.त्यांना अटक करण्यात आली असून वजिराबाद नांदेड पोलिस ठाण्यात या महिला अधिका-यां विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायदा व भ्रष्टाचार अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता बिरगे यांच्या साई आशिष,घर नं.७६,छत्रपतीनगर ,पुर्णारोड नांदेड येथील निवासस्थानाची ला.लु.प्र.विभाग नांदेड ने झाडा झडती घेतली असून या कार्यवाहीने जि.प.नांदेड मधील काही भ्रष्ट अधिकारी कर्मचा-यांचे धाबे दणाणून गेले आहेत.


Next Story
Share it
Top
To Top