पी.रामदास
- उद्धवा, अजब तुझे शिवसैनिक
नांदेड - मन्नेरवारलू या आदिवासी जातीचे नेते साहेबराव बागेलवाड यांच्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी प्राणघातक हल्ला करून त्यांची धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे .
30 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. मन्नेरवारलू समाजाचे बागेलवाड हे नेते असून राज्य उत्पादन शुल्क विभागातून ते निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत . या मारहाणीत बागेलवाड यांचा डावा डोला निकामी झाला आहे .
या मारहाणीच्या निषेधार्थ सर्व आदिवासी समाज 1 मे रोजी नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात एकत्र येणार आहे , अशी माहिती अखिल महाराष्ट्र मन्नेरवारलू संघटना पुणे आणि आदिवासी मन्नेरवारलू संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली आहे .