दहशतवादी सलिम खानला मुंबईतून अटक

दहशतवादी सलिम खानला मुंबईतून अटक

मुंबई:संशयित दहशतवादी सलिम खान याला मुंबईतून अटक करण्यात आले. उत्तर प्रदेश एटीएसने मुंबईत येऊन ही कारवाई केली आहे. सलिम याने परप्रातांत जावून दहशतीचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती आहे.

सलीम हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातील मंदीपूर गावातील रहिवासी आहे. त्याने २००७ साली मुझफ्फराबाद येथे दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. १ जानेवारी २००८ रोजी रामपूर सीआरपीएफ हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला दहशतवादी, कौसर आणि शरीफ यांनी सलीमने आपल्यासोबत मुझफ्फराबादेत प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली होती. त्यातील त्याचा सहभाग समोर येताच, २००८ पासून तो सुरक्षा यंत्रणांच्या रडावर होता. सलीमच्या दहशतवादी कारवायांमधील सहभागामुळे त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.

सलीम हा विदेशातून आफताबला सूचना देत होता. त्याच्या सांगण्यावरून आफताब पुढील सूत्रे हलवीत असे, तसेच आफताबला पैसे पुरविण्याचे कामही तो करत असल्याचे समोर आले. त्यानुसार,यूपी आणि महाराष्ट्र एटीएस सलीमच्या मागावर होती.


Next Story
Share it
Top
To Top