जळगाव । सिमी अर्थात स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या खटल्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान यांना न्यायालयाने शनिवारी 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
महाराष्ट्रात हिंदू वस्त्यांमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न तसेच देशविघातक कृत्य करणाऱ्या दहा जणांविरूद्ध 25 जुलै2001 रोजी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा निकाल 19 मे 2006 रोजी लागला होता. त्यात 6 आरोपींना शिक्षा झाली होती तर 4 आरोपी निदरेष मुक्त झाले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत या गुन्ह्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा. जळगाव) या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.