स्वताच्या नातीवर केला बलात्कर

स्वताच्या नातीवर केला बलात्कर

मुंबई स्वताच्या नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चारकोप परिसरात घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने चारकोप पोलिस ठाण्यात आपल्या 56 वर्षीय आजोबा विरोधात गुन्हा नोदवला आहे. तिच्यावर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला असा आरोपा मुलीने केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर 3 एप्रिल रोज पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिचे आईवडील तिला कुपर रूग्णालयात नेले असता ती दोन महिण्याची गर्भवती असल्याची धक्कादाय़क माहिती समोर आली आहे.

यानंतर कुटुंबीयांनी मुलीची विचारपूस केल्यानंतर तिनं आजोबांनी अत्याचार केल्याचे आरोप केले. यानंतर तिच्या आजोबांविरोधात चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. चारकोप पोलिसांव्यतिरिक्त क्राईम ब्रांचचं युनिट 11 देखील या प्रकरणाची तपासणी करत होते. आरोपी आजोबा गुजरातमध्ये असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली. त्याला मुंबईत बोलवण्यासाठी तपास पथकाने पीडित मुलीच्या शेजा-यांची मदत घेतली आणि आरोपी मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याला अटक केली.


Next Story
Share it
Top
To Top