​पोलिसाच्या चाकुहल्यात सात जण जखमी

​पोलिसाच्या चाकुहल्यात सात जण जखमी

तर स्वतःपोलिसही गंभीर

परभणी शहरातील धनुबाई प्लॉटवर एका पोलीस कॉन्स्टेबलने सात जणांवर चाकू हल्ला केला. प्रतिहल्ल्यात त्या सात जणांनी सदर पोलिसाला फाईइटरने मारहाण केली. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. तर सदर सात जणांपैकी दोघे गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस मुख्यालयात अंजना रासकटला हा पोलीस कॉन्स्टेबल कार्यरत आहे. तो रविवारी सायंकाळी ५.३० वाजता ड्युटी संपवून धनुबाई प्लॉटवरील घरी परतत होता. मात्र या ठिकाणी रस्त्यावर दोन महिलांसह सात जण गप्पा मारत उभे होते. त्यांच्या गप्पा चालू असताना अंजना रासकटला यांना चिडवल्याचा भास झाला.

त्यामुळे संतापाच्या भरात रासकटला यांनी चाकूने या सात जणांवर हल्ला केला. ज्यामुळे प्रतिउत्तरात त्यांनी देखील फाईइटरने रासकटला यांना जोरदार मारहाण केली. यामध्ये रासकटला हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रूग्णालयातून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटीत हलवले आहेतसेच या घटनेत जखमी झालेल्या सात जणांपैकी गणेश गडप्पा व श्रीनिवास हे दोन जण देखील गंभीर असून त्यांच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरीत पाच जणांमध्ये सुनिता कटकुरी, विजया मुक्का, रमेश गडप्पा, निलेश मुठा आणि विकास येलकुटा आदींचा समावेश असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.

जखमींपैकी कुणाचीच परिस्थिती जबाब देण्याची नव्हती. त्यामुळे उशीरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही​.


Next Story
Share it
Top
To Top