१४ वर्षाच्या तरुणाचा कोंबडीवर बलात्कार, हत्या

इस्लामाबाद: आपल्याकडे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ठार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु पाकिस्तानमध्ये अशीच एक घटना घडली असून त्यामुळे सर्वच चक्रावून गेले आहेत पाकिस्तानमध्ये एका १४ वर्षाच्या अल्पवयीन तरुणाने कोंबडीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर कोंबडीची त्याने हत्या देखील केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. ११ नोव्हेंबर रोजी १४ वर्षीय अल्पवयीन तरुणाने आपल्या गावातील कोंबडीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. कोंबडीच्या मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तरुण कोंबडी आपल्या घरी घेऊन गेला होती अशी माहिती त्यांनी तक्रारीत दिली आहे. त्यांनी दोन साक्षीदारांची नावंही पोलिसांना सांगितली आहेत. कोंबडीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस अधिकारी सरफराज अंजुम यांनी सांगितलं आहे.


Next Story
Share it
Top
To Top