भोकर पोलीस ठाणे झाले आता " स्मार्ट "

भोकर पोलीस ठाणे झाले आता  स्मार्ट

उत्तम बाबळे

भोकर: -अवैध धंद्यानी उच्छाद मांडल्याच्या घटनांनी कुप्रसिद्ध झालेल्या पोलीस ठाण्याचा कांही महिन्यापूर्वीच पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी पदभार स्वीकारला व तुटपुंज्या कर्मचारी बळावर अवैध धंद्यावर आळा घालत संगणकीय तंत्रज्ञान प्रणालीचा सदुपयोग करत बिनतारी संदेश यंत्र घेऊन धावणारी चारचाकी (जिप) थेट जीपीएस द्वारे संगणकाशी जोडली आणि दैनंदिन कार्यालयीन कामकाज ही संगणकाद्वारे वरीष्ठ कार्यालयांशी जोडल्याने भोकर पोलीस ठाणे हे नांदेड जिल्ह्य़ातील " स्मार्ट "ठाणे झाले आहे.

भोकर तालुका हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरील असल्यामुळे राजकिय व गुन्हेगारी जगतात संवेदनशील म्हणुन सुपरिचित आहे.गेल्या कांही महिन्यापूर्वी भोकर पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी पदभार घेतला आणि तालुक्यात सर्वत्र अवैध धंद्यानी उच्छाद मांडला.पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाने एका विशेष पथकाने अचानक पणे महाराष्ट्र- तेलंगणा राज्य सिमे लगत असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला व अवैध धंद्याचे कुरूप महाराष्ट्र राज्यातील पोलीस खात्यासह जनतेसमोर आनले. या कारणावरून पो.नि.चंद्रशेखर चौधरी यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. आणि त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांची नियुक्ती करण्यात आली.

[video width="640" height="352" mp4="https://www.mahabatmi.com/wp-content/uploads/2017/01/VID-20170118-WA0001.mp4"][/video]

अशा कठीण परिस्थितीत भोकर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यामुळे बिघडलेली घडी सुरळीत करणे हे एक त्यांच्यापुढे आव्हान होते.भोकर तालुक्यातील ६६ गावे, भोकर शहर व मुदखेड तालुक्यातील ६ गावे असे व्यापक कार्यक्षेत्र असलेल्या पोलीस ठाण्याचा कार्यभार १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक (रिक्त आहे),३ पोलीस उपनिरीक्षक (१ महिला)आणि उर्वरीत ८० पोलीस कर्मचारी (यात २ महिला पोलीस रिक्त जागा) अशा एकुण ८५ पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे.या स्थितीत ही आहे .ते आव्हान पेलण्याचा मान पोलीस निरीक्षक संदिपान शेळके यांनी केला.

यात संगणकीय ज्ञान प्राप्त असलेले २५ ते ३० पोलीस कर्मचारी त्यांच्याकडे उपलब्ध असल्यामुळे त्यांना बरेच कांही करता आले.पोलीस खात्या मार्फत पुरविण्यात आलेल्या ६ संगणकांचा उपरोक्त कर्मचाऱ्यांकडून सदुपयोग करून घेतला.

गुन्हा दाखल करणे ( FIR ),पंचनामे नोंदी,दोषारोपपत्र नोंदविणे,जप्ती मुद्देमालाच्या नोंदी घेऊन त्याची वर्गवारी नुसार नोंद ठेवणे, ५ ते २० वर्ष कालमर्यादेतील कालबाह्य कागदपत्र बाद करून अ आणि ब रेकॉर्ड सुव्यवस्थित पणे नोंदीत ठेवणे

आदी कामकाज या संगणकांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. पोलीस ठाणे CCTV च्या नजरेत आणले असून भोकर शहरातील वर्दळीच्या व संवेदनशील ठिकाणी ही CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.यासाठी भोकर नगर परिषदेची मदत घेण्यात येत असून नुकतीच नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, उपनगराध्यक्ष गोविंद पाटील,नगरसेवक केशव मुद्देवाड, सुवेश पोकलवार, शेख वकील शेख खैराती, खाजा तौफिक इनामदार, डाॅ.राम नाईक, राजेश्वर कदम आदींसह नुकतीच एक बैठक सपन्न झाली आहे.

बिनतारी संदेश यंत्र घेऊन कार्यक्षेत्रात धावणाऱ्या पोलीस जिप ला जीपीएस तंत्रज्ञान प्रणालीशी जोडण्यात येत आहे. तर ९५% पोलीस कर्मचारी अँड्रॉइड स्मार्ट फोन द्वारे एका ग्रुपवर एकमेकांशी जोडली आहेत. त्यामुळे थेट एकमेकांशी संवाद साधत कामकाज करणे सोईस्कर झाले आहे. इंटरनेट व संगणकीय कामकाज एकत्रीकरणातुन भोकर पोलीस ठाण्यातील होत असलेले कामकाज वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात कुठेही पाहणे आता सहज सोपे झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत व्यायाम घडवीत खेळासाठी व्हॉलीबॉल मैदान ही उपलब्ध करण्यात आले आहे.तसेच पोलीस ठाण्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देत कायदा व सुव्यवस्था सांभाळत अवैध धंद्याची घाण देखील कमी करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था व पोलीस कार्यालयीन कामकाजा विषयी माहिती शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देऊन जनजागृती करण्यात येत आहे.४ G डिजिटल युगात इंटरनेट व संगणकीय तंत्रज्ञान प्रणाली वापरुन ग्रामीण पोलीस विभाग कामकाजाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करणारे नांदेड जिल्ह्य़ातील भोकर पोलीस ठाणे हे एक उदाहरण ठरले आहे.याच प्रकारे देगलूर पोलीस ठाणे ही कामकाज करणारे दुसरे ठाणे आहे.पोलीस निरीक्षक संदिपान शेळके हे कार्यरत असलेल्या भोकर पोलीस ठाण्याची इमारत ही निजाम कालीन जुनीच परंतु इंटरनेट संगणकीय तंत्रज्ञान प्रणालीतुन नव्या रुपात " स्मार्ट "झाली आहे.नव्हे तर पोलीस अधीक्षक संजय येनपुरे व वरिष्ठांनी भोकर पोलीस ठाण्यास " स्मार्ट "झाल्याचे प्रशस्तीपत्रच दिले आहे.


Next Story
Share it
Top
To Top