नफा कमावून देण्याचे अमिष दाखवून दोन कोटींना गंडा

नफा कमावून देण्याचे अमिष दाखवून दोन कोटींना गंडा

मुंबई- तांदूळ निर्यातीतून कोट्यवधींचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाला चार जणांनी दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार भाईंदरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने दोन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांचे पती फरार झाले आहेत. त्यांचे नाव तहसीन मुंशी, व निलोफर दाउद मुंशी अशी अटक केलेल्या महिलेची नावे आहेत. फरार आरोपी गुलाम मुंशी, दाउद मुंशी फरार झाले आहे. हे सर्वजण मीरा रोड येथील रहिवाशी आहेत. या चौघांना कुर्ला येथील एकाला पावणे दोन कोटी रुपयांना गंडा घातला आहे. त्याला तांदूळ निर्यातीतून नफा कमावून देण्याचे आश्वासन वरील चौघांनी दिले होते. परंतु त्यास काहीही फायदा दिला नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मोहमंद अहमद शेख यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.


Next Story
Share it
Top
To Top