नांदेड जिल्ह्यात ८ मे च्या मध्यरात्री पर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

उत्तम बाबळे

नांदेड :- जिल्ह्यात सोमवार ८ मे २०१७ रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आगामी काळातील उत्सव, मिरवणुकांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये जिल्ह्यात मंगळवार २५ एप्रिल २०१७ ते सोमवार ८ मे २०१७ रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.


Next Story
Share it
Top
To Top