टिप्पर व मिनी बस अपघातात ३ जण मृत्यू ४ जण गंभीर जखमी  

टिप्पर व मिनी बस अपघातात ३ जण मृत्यू  ४ जण गंभीर जखमी  

उत्तम बाबळे नांदेड :-बिलोली नर्सी महामार्गावरील माै.कासराळी शिवारातील कमल पेट्रोल पंपाजवळ रेती घेऊन भरधाव वेगात जात असलेल्या टिप्पर ने देवदर्शनासाठी जात असलेल्या पुणे येथील भावीकांच्या मिनी बसला उडविले.झालेल्या या भिषण अपघातात मिनी बस मधील ३ भाविक जागीच ठार झाले असून ४ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.या अपघात प्रकरणी टिप्पर चालका विरुद्ध बिलोली पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलोली नर्सी महामार्गाने तेलंगणा राज्यातील खुदनापुर जि.निजामाबाद येथे देवदर्शनासाठी मिनी बसने पुणे जिल्ह्यातील १५ ते १८ भाविक जात असतांना बिलोली कडून भरधाव वेगात नर्सीकडे येत असलेल्या रेती वाहक टिप्पर क्र. एम.एच.०४ एफ.८५७६ ने दि.३० एप्रिल रोजी पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान माै.कासराळी ता.बिलोली शिवारात कमल पेट्रोल पंपाजळ भाविकांच्या त्या मिनी बस क्र.एम.एच.१२ एच.बी.१९५७ ला जोराची धडक दिली.या भिषण अपघातात मिनी बसच्या उजव्या बाजूचा पत्रा कापत गेला व या बाजुस बसलेले प्रवासी भाविक जयश्री गणपत कडतन (५५) रा.स्वारगेट पुणे, विजय माला विजय कडतन (५०) रा.स्वारगेट पुणे व सार्थक राजेश(१२) ,रा.पुणे हा मुलगा असे ३ जण जागीच ठार झाले.तर वरद संतोश चिञे (११) रा. धनकवाडी ता.काञज जि.पुणे , गंगाराम पंढरीनाथ कडतन(८५) , कस्तुरी गंगाराम कडतन (३०) व मिनि बस चालक हे यात गंभीर जखमी झाले असून या गभीर जखमींवर बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डाॅ.तानाजी लवटे यांनी प्रथमोपचार करुन त्यांना अधिक उपचारार्थ नांदेड येथें रवाना केले.तसेच बरेच प्रवासी भाविक किरकोळ जखमी झाले होते.त्यांच्यावरही प्रथमोपचार करण्यात आले. या भिषण अपघाता विषयीची फिर्याद संतोश सुधाकर चिञे रा.धनकवाडी ता.काञज जि. पुणे यांनी तक्रार दिल्यावरुन टिप्पर चालका विरुध्द बिलोली पोलिस ठाण्यात कलम ३०४(अ)२७९,३३७,३३८,४२७ भावि व मोटार वाहन कायद्यानुसार टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक फरार झाला आहे या दुर्दैवी अपघाताविषयी परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील अधिक तपास सहाय्यक पो.नि.चव्हाण हे करीत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top