अंधेरीतून तब्बल ६.४९ किलोचे कोकेन जप्त 

अंधेरीतून तब्बल ६.४९ किलोचे कोकेन जप्त 

मुंबई । अंबोली पोलिसांनी अंधेरी येथून रविवारी (१० फेब्रुवारी) तब्बल ६.४९ किलोचे कोकेन जप्त करून ३ तरुणांना अटक केले आहे. या तिघांपैकी २ जण नायजेरियन तर १ जण ब्राझीलचा असल्याची माहिती मिळत आहे. निरस अझुबिक ओखोवा (३५), सायमन अगोबता (३२) व मायकेल संदे होप (२९) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३८ कोटी ९५ लाख ९७ ,६०० रुपये इतकी आहे.

अंधेरीतील मोर्या लॅन्डमार्क दोन या परिसरात घरातील दरवाजे, खिडक्यांना लावण्यात येणाऱ्या कापडी पडद्यातील धातूच्या रिंगमध्ये हे अंमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय टोळीतील काहीजण विक्रीसाठी हे अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून या संशयास्पद हालचाली करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यात घेऊन या तरुणांची झडती घेतल्यानंतर पोलिसांना प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेले कोकेन सापडले.त्यानंतर त्यांच्या राहत्या ठिकाणी छापा घातल्यास तेथेही मोठ्या प्रमाणावर कोकेन आढळले. शहर आणि उपनगरातील ‘पेज थ्री’ पार्ट्या व महाविद्यालयीन मुलांना हे अंमली पदार्थ पुरविण्यात येत होते, अशी माहिती अप्पर आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या ३ जणांपैकी निरस अझुबिक याच्यावर ‘एनडीपीएस’अतर्गंत कारवाई करण्यात आली असून २ महिन्यांपूर्वीच निरस भायखळा कारागृहातून सुटला होता. त्याच्याकडे ८० हजार रुपयांची बेल पावती मिळाली आहे.


Next Story
Share it
Top
To Top