अभिनेत्री माही गिल मारहाण प्रकरणी पोलिसांकडून ७ जण अटकेत

अभिनेत्री माही गिल मारहाण प्रकरणी पोलिसांकडून ७ जण अटकेत

मुंबई | अभिनेत्री माही गिल सध्या एकता कपूरच्या अल्ट बालाजीच्या ‘फिक्सर’ या वेबसिरिजमध्ये काम करत आहे. या वेबसिरिजचे चित्रीकरण ठाण्यात सुरू आहे. या वेबसिरिजच्या सेटवर काही अज्ञात व्यक्तींनी काल (१९ जून) क्रू मेंबरना मारहाण करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकरणा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील घडली असून तिग्मांशू धुलिया यांचे दिग्दर्शन करत आहे. या प्रकरणाची तक्रार ठाणे पोलिसांत करण्यात आली असून सेटवर माहीप्रमाणेच तिग्मांशू धुलिया, शब्बीर आहुवालिया तसेच तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.

https://twitter.com/dirtigmanshu/status/1141337296706232320

या घटनेनंतर माही गिली आणि वेबसिरिजमधील विधीमंडळात जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. फिल्टर या वेबसिरिजच्या सेटवर काय झाले हे तिग्मांशू धुलिया यांनी ट्वीटर अकाऊंटवरून सांगितले आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत या चित्रपटाची टीम एका रुग्णायलाच्या बाहेर उभी असून त्यांच्यासोबत माही गिल देखील दिसत आहे. तसेच या वेबसिरिजचे कॅमेरामॅन संतोष तुंडियाल या व्हिडिओत दिसत असून त्यांच्या डोक्याला पट्टी बांधलेली आहे.

‘मीरा रोड येथे शूटिंग करण्यासाठी आम्ही लोकेशन मॅनेजरला पैसे दिले होते. तसेच या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी आम्ही सर्व परवानग्या काढल्या आहेत. तरीही संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान दारू प्यायलेले काही लोक सेटवर आले. त्यांनी या शूटिंगसाठी आम्हाला का विचारले नाही, असे म्हणत आम्हाला आणि सेटवरच्या इतरांनाही काठ्यांनी आणि रॉडने मारहाण केली.’’


Next Story
Share it
Top
To Top