दिवा येथे एका रिक्षातून स्फोटक पदार्थांचा मोठा साठा जप्त

दिवा येथे एका रिक्षातून स्फोटक पदार्थांचा मोठा साठा जप्त

ठाणे | दिवा आगासन रस्त्यावर एका रिक्षातून २५० जिलेटीन आणि २५० डिटोनेटर्स असा स्फोटकाचा साठा जप्त करण्याची कारवाई मुंब्रा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी गुलाबसिंग रावतसिंग सोलंकी या आरोपीस अटक करण्यात आले आहे. सदर आरोपीस गुरुवारी(२९ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके आली कोठून असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

पोलिसांना माहिती मिळाताच या रिक्षाची तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर २५० जिलेटीन आणि २५० डिटोनेर हे स्फोटक पदार्थ आढळून आले. हे स्फोटक पदार्थ घेऊन जाणार्‍या गुलाबसिंग रावतसिंग सोलंकी या इसमास पोलिसांनी अटक केली. अटकेतल्या इसमाने हे स्फोटक पदार्थ राजस्थान येथून आणले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

मुंब्रा पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सचिन चरडे, पोलीस नाईक कैलास पाघीर, मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, खरात आणि क्षीरसागर यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून एका संशयास्पद रिक्षास ताब्यात घेतले.


Next Story
Share it
Top
To Top