मुंबई | 'बिग बॉस मराठी' सीझन - २ मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला अटक करण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत दाखल झाले आहे. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चेक बाऊन्स प्रकरणात सातारा न्यायालयाने बिचुकलेविरोधात वॉरंट जारी केले आहे.
बिग बॉस मराठीचा सेट मुंबई येथील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनी अटकेच्या कारवाईसाठी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती. बिचुकलेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे. बिचुकले बिग बॉस मराठीचा स्पर्धेत आहे. परंतु पोलिसांच्या या कारवाईनंतर बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर होणार ही स्पर्धेत कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.