मटका छाप्यात ८ जणांसह ६८ हजाराचा व रेती वाहन कारवाईत ४ टिप्परसह ४८ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल केला जप्त
उत्तम बाबळे
नांदेड :- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पोलीस पथकाने ६ जुलै रोजी एकाच दिवशी दोन तालुक्यात धाडसी कारवाई केली असून नायगाव येथील मटका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात ८ जुगारीसह ६८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरील अड्डा उध्वस्त करुन बिलोली तालुक्यात परवानगी पेक्षा अधिकची रेती घेऊन जात असलेले अवैध रेती वाहक ४ टिप्पर ताब्यात घेऊन ४८ लाख ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष पोलीस पथक प्रमुख सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी लाठकर, जगताप,वानखेडे,कुलकर्णी,पायना
ही कारवाई करुन नांदेडकडे परत येत असतांना बिलोली ते कार्ला दरम्यान अवैद्य रेतीची वाहतूक करत असलेल्या टिप्पर विषयी पथकास गुप्त माहिती मिळाल्यावरुन त्यांनी साफळा रचून बसले असता सायकांळी ६:०० वाजता कार्ला फाट्याकडून रेती घेऊन येणारे चार टिप्पर पथकास दिसले.त्यांना अडऊन चाैकशी केली असता त्यांत्याकडे बनावट पावत्या व टिप्पर मध्ये क्षमतेपेक्षा अधिकची अवैध रेती निष्काळजीने नेतांना आढळले.यावेळी शलाका कृष्णा मनोहर पवार(२२) , टिप्पर मालक संतोष बेंद्रीकर रा.बेंद्री,ता.नायगाव,चालक सुमेध उत्तम वाघमारे (२४), टिप्पर मालक मिरझा बेग रा.धनेगाव,नांदेड, चालक दिगंबर गणपत गायकवाड(२५) ,टिप्पर मालक संतोष पाटील बेंद्रीकर ता.नायगाव, चालक प्रकाश हवगीराव(२२) ,टिप्पर मालक संतोष पाटील बेंद्रीकर ता.नायगाव या ८ जणांना टिप्परसह ताब्यात घेऊन परवण्यापेक्षा अधिकची रेती भरणा करुन टिप्परमद्वारे नांदेड शहरात अवैद्य विक्रीसाठी रेती नेत असलेले चार टिप्पर रेतीसह जप्त करण्यात आले.हा मुद्देमा एकूण ४८ लक्ष ५६ हजार रुपयाचा असून सहा.पो.नि.ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ८ जणाविरुद्ध कलम ३८९, ३३६ भादंवि प्रमाणे बिलोली पोलीसात आणि ८ जणा विरुद्ध मुंबई जुगार कायद्या नुसार नायगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.