सात वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

सात वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये राहिल्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा

औरंगाबाद : तब्बल सात वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येराहिल्यानंतर दोघांमध्ये वितुष्ट आल्यामुळे प्रेयसीने प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार केल्याची घटना येथील पुंडलिक नगरमध्ये घडली. याप्रकरणी माजी सैनिकअसलेल्या प्रियकराविरुद्ध पुंडलिक नगर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

लहू कडाजी नाटकर (३३, रा. जालना) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार आणि आरोपी यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. पुंडलिकनगर परिसरात एकाभाड्याच्या घरात ते सात वर्षांपासून राहात होते. या काळात लग्नाचे आमिष दाखवून लहूने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती पाच महिन्यांची गर्भवती आहे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेने लहूकडे लग्नासाठी सतत आग्रह धरला. सुरुवातीला त्याने तिला आज करू, उद्या करू, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, बाळाच्या जन्मापूर्वी आपला विवाह होणे आवश्यक असल्याचे पीडितेने त्यास सांगताच आरोपीने लग्नास नकार दिला. तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने शनिवारी थेट पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पीडिता येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. लहू जालना येथून रोज ये-जा करून तिच्यासोबत राहात होता.


Next Story
Share it
Top
To Top