अकोला बुधवारी सकाळी सात वाजता ट्रकने बाईकला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. आपताबोद्दी कलिमोद्दीन 17 आणि मुज्जमिल शेख (20)असे मृतांचे नाव आहेत. दोघंही बाईकने नवीन वस्तीकडे जात होते. यादरम्यान, अमरावतीहून अकोल्याकडे जाणा-या भरधाव ट्रकनं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील चौकशी सुरू आहे.