पोलिस अधिका-्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या , मृतदेहाचे तुकडे करून बेळगावच्या अरण्यात फेकले

पोलिस अधिका-्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून हत्या , मृतदेहाचे तुकडे करून बेळगावच्या अरण्यात फेकले

मुंबई अंबरनाथ येथे एका तरूणीवर सामुहिक बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणी एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिच्या बालमित्रानेच तिला पार्टीसाठी बोलावून तिच्यावर सामुहिक बलात्कर केले. त्यानंतर तिचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरून बेळगावच्या अरण्यात फेकले.निकलेश पाटील (24) व अक्षय वालोदे (25) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

तरूणी नागपूरच्या एका पोलिस अधिका-याची मुलगी आहे. काही दिवसापूर्वीच मुंबईला कॉलसेंटमध्ये नोकरीसाठी आली होती. अंबरनाथ येथे राहत होती. अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव परिसरात तिच्या बालमित्रांनी पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले दोघांनी तिच्यावर अाळीपाळीने सामुहिक अत्याचार करून ती या घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करेल या भीतीने तिला जीवेठार मारून तिचे प्रेत बॅगेत भरून कारमध्ये घालून बेळगावच्या हद्दीत फेकून दिले.या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना रत्नागिरीतून दोघांना अटक केली असून दोघांनी गुन्हा कबुल केला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल करून पुढाल तापस करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top